Friday, May 3, 2024

Latest Posts

सत्ताधाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर सत्तेचा गैरवापर करतील, Sharad Pawar यांचा BJP वर निशाणा

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) पहिला टप्पा पार पडला असून उर्वरित सहा टप्पे १ जूनपर्यंत पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांकडून देशभरात ठिकठिकांणी प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. अश्यातच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmadnagar Loksabha Constituency) उमेदवार निलेश लंके यांच्या अहिल्यानगर (आधीचे अहमदनगर) येथील स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “टीका करणाऱ्या लोकांबद्दल मला आज काही जास्त बोलायचे नाही. ते माझ्यावरही टीका करतात. बाळासाहेबांवरही टीका करतात. ज्या लोकांना राजकारणातला रस्ता ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबावर टीकाटिपणी करतात त्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की माणुसकी नाही. अनेकांवर टीका केली जाते. आता या लोकांबद्दल काय सांगायचं, जे लोक किती पक्ष बदललेले आहेत. कधी शिवसेनेत होते, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले विरोधी पक्षनेता झाले, विरोधी पक्षनेते पद उपभोगलं, ते सोडून दिलं भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसलेत आणि ते आज टीकाटिपणी करत असतात.”

ते पुढे म्हणाले, “कुठे शेतीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, तरुणांना रोजगाराच्या संबंधित प्रश्न आहेत, उपेक्षित समाज महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आहेत. हे सगळं बदलायचं असेल तर एक भक्कम सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे, त्यांना लोकांच्या प्रश्नांसंबंधी यतकिंचितही आस्था नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांच्याबद्दल टीका सबंध देशामध्ये केली गेली. लोक त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतात यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा लोकशाही आणि संविधान हे शिल्लक राहणार की नाही?”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्टाने घटना आपल्याला दिली. त्यामुळे हा देश एकसंघ राहिला. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये अशी घटना नव्हती, त्यामुळे अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. पाकिस्तानचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. बांगलादेशचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. श्रीलंकेचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. नेपाळचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. भारतामध्ये कधी हुकूमशाही नव्हती, त्याचे महत्त्वाचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला दिली, की त्या घटनेच्या जोरावर हा देश एकसंघ राहिलेला आहे. पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधी काहीतरी चुकीचा विचार हा राज्यकर्त्यांच्या डोक्यात येतो की काय अशी शंका आमच्या मनात आहे. यांनी पुन्हा सत्ता हातात घेतली तर सत्तेचा गैरवापर करतील. ते जर पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपाचा पराभव करणे तुमच्या माझ्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका, Parbhani, Nanded येथे आज प्रचारसभा

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या Narendra Modi ना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही? – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss