Tuesday, May 21, 2024

Latest Posts

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणाहून रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता रविंद्र वायकर यांच्या नावाची वर्णी लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रविंद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. वायकर यांच्या उमेदवारीला मित्र पक्षातील काही जणांकडून विरोध झाला होता. पण आता शेवटी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात अली आहे. रविंद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार असून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्याकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे ट्वीट शिवसेनेच्या अधिकृत हॅण्डलवरून करण्यात आले आहे.

काय आहे शिवसेनेचे ट्विट?

लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रविंद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !

हे ही वाचा:

“पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल”;PM Narendra Modi यांची इंडियावर टीका

PM Narendra Modi यांची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss