Thursday, May 16, 2024

Latest Posts

“पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल”;PM Narendra Modi यांची इंडियावर टीका

मला तुमची धनदौलत नको, मला सोलापूरकरांचा आर्शिवाद पाहिजे.

(Pm Narendra Modi )पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते(Ram satpute) यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मोदींनी “विरोधक फक्त मलई खाण्याचं काम करतात” असे म्हणत विरोधकांवर घणाघाती टीका केली.

इंडिया आघाडीत महायुद्ध सुरु आहे. ५ वर्षात ५ मुख्यमंत्री असा विरोधकांचा फॉर्म्युला आहे. आरक्षणासाठी मोठा निर्णय घेण्याची माझी तयारी आहे. मला तुमची धनदौलत नको, मला सोलापूरकरांचा आर्शिवाद पाहिजे. कॉंग्रेसच्या काळात एस.सी.एस.टी आणि ओबीसी यांचे हाल झाले आहेत. कोणीही संविधानाला धक्का लावू शकत नाही. आरक्षणाचा मोठा हिस्सा अल्पसंख्यांकांना देण्याचा कॉंग्रेसने घाट घातला आहे. कॉंग्रेसने जाती-जमातींचा विकास होऊ दिला नाही.असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, मी गरिबांच्या खाल्ल्या मिठाला जागत आहे. १० वर्षात माझा कार्यकाळ तुम्ही पाहिला आहात. नकली शिवसेनेकडे पंतप्रधानासाठी खुप चेहरे आहेत. १० वर्षात पहिल्यांदा २५ कोटी जनाता दारिद्र्यरेषेच्या वर गेली. मोदींवर टीका करणं हेच इंडिया आघाडीचं उद्दिष्ट आहे.कॉंग्रेसचं केवळ वॉट बॅंककडे लक्ष आहे. देशासाठी शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहचवणं हेच आमचं लक्ष. माझ्यासाठी मतदार नंतर देशाचा नागरिक पहिला आहे. मला गरिबांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवायचं आहे. आता मराठीमधून देखील डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकतात. इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याकडे भाषणासाठी मुद्दा नाही. इंडिया आघाडीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा शब्दात इंडिया आघाडीवर ताशेरे ओढले तर राम सातपुते यांना भव्य मतांनी विजयी करा असे देखील प्रचारसभेत जमलेल्या जनतेला मोदींनी आव्हान केले.

दलित आदिवासी ओबीसी नेते देशाचं नेतृत्व करणार आहेत. मोदी आणि देशाचं “दिल का नाता” आहे. आमच्या योजना भेदभाव करण्याऱ्या नाही.पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल झाला. अशा शब्दात मोदींनी इंडिया आघाडीसह कॉंग्रेसवर टीका केली.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांची मोठी घोषणा, सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी न झाल्यास…

PM Narendra Modi यांची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss