Saturday, May 4, 2024

Latest Posts

Parth Pawar यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, कारण काय?

सध्या निवडणुकीचे (Loksabha Elections २०२४) वारे सर्वत्र वाहत आहे. अश्यात प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी प्रचार करत आहेत.भर उन्हामध्ये कसलाहि विचार न करता प्रत्येक उमेदवार प्रचारामध्ये गुंतला आहे.

सध्या निवडणुकीचे (Loksabha Elections २०२४) वारे सर्वत्र वाहत आहे. अशात प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी प्रचार करत आहेत. भर उन्हामध्ये कसलाही विचार न करता प्रत्येक उमेदवार प्रचारामध्ये गुंतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील प्रचारात मग्न आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे देखील प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यांना आता थेट वाय प्लस (Y Plus) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने पार्थ पवारांना वाय प्लस सेक्युरिटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्थ पवार यांची आई बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यांच्यासाठी पार्थ पवार हे प्रचार करत आहेत. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पार्थ यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या कार्यकर्ते तसेच नागरिक यांना भेटून प्रचार करत आहेत. याचमुळे सरकारने पार्थ पवारांना वाय प्लस सेक्युरिटी देण्याचा निर्णय घेतला आहे. पवार कुटुंबामधीलच युगेंद्र पवार (Yugendra Pawar) जे शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून प्रचार करत आहेत. बारामतीच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून त्या प्रचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान लोकांनी युगेंद्रभोवती घेराव घातला होता. या नंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी युगेंद्र आणि रोहित दोघांपैकी सुरक्षेची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. एकीकडे पुणे पोलिसांनी महत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा काढली आहे आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना वाय प्लस सेक्युरिटी दिली आहे.

हे ही वाचा:

Kurla च्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा उपक्रम

World Book Day : पुस्तकांसाठी घर बांधणारे Dr. Ambedkar, Jitendra Awhad यांची पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss