Friday, May 3, 2024

Latest Posts

World Book Day : पुस्तकांसाठी घर बांधणारे Dr. Ambedkar, Jitendra Awhad यांची पोस्ट चर्चेत

२३ एप्रिल रोजी जगभरात पुस्तक दिन साजरा करण्यात येतो. यंदा असणाऱ्या अनेक राजकीय मंडळींकडून पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या सोशल मिडीयाच्यामार्फत पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ‘एक्स’ च्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे विचार लिहून सर्वांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? 

स्वतःच घर बांधणे हे सर्वांचेच स्वप्न असते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिससरात पुस्तकांसाठी घर बांधले. हे भारताच्या इतिहासातले पहिले व्यक्ती होते ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. या राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५० हजारांहून अधिक ग्रंथाचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर पुस्तकप्रेमी होते. पुस्तकांना ते आपला जीव की प्राण मानत होते. पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथसंग्रह मागितला होता त्यासाठी बाबासाहेबांना त्याकाळी ६ लाख रुपये द्यायला तयार होते. परंतु पुस्तकप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तो त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता.

जर तुमच्याकडे २ रुपये असतील तर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर एकदा म्हणाले होते, “जर तुमच्याकडे २ रुपये असतील तर त्यातील १ रुपयांची भाकरी घ्या आणि रुपयांचं पुस्तक.” कारणं भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचं ते शिकवेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीतून दलित आणि देशाच्या समस्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये अनहिलेशन ऑफ कास्ट, द बुद्ध अँड हिज धम्म, कास्ट इन इंडिया, हू वेअर द शूद्राज..?, रिडल्स इन हिंदुइझम, अशी अनेक महत्वपूर्ण पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्यकृती त्यांच्या विशिष्ट सामाजिक दृष्टीकोनासाठी आणि विद्वत्तेसाठी प्रख्यात आहे, जी त्यांच्या काळातील त्यांची दूरदृष्टी आणि पुढचा विचार दर्शवते. आंबेडकरांचे ग्रंथ भारतासह जगभर मोठ्या प्रमाणावर वाचले जातात.

आंबेडकर यांच्या शिकवणीची प्रकर्षाने आठवण येते…

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे त्यांचे ‘भारतीय बौद्धांचे धर्मग्रंथ’ आहे आणि बौद्ध देशांमध्ये महत्त्वाचे आहे. त्यांचे डी.एस्सी. रुपयाच्या समस्येचे व्यवस्थापन: त्याची उत्पत्ती आणि त्याचे निराकरण यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आज जागतिक पुस्तक दिन आहे, जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीची प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा”. शिक्षणाने आपण आयुष्याचे मूल्यमापन करतो, आपले ध्येय ठरवतो, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतो म्हणून मी सर्व तरुणांना म्हणेल, “वाचाल तर वाचाल”. “जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व पुस्तक प्रेमींना हार्दिक शुभेच्छा.” 

हे ही वाचा:

Kalyan-Dombivali करांची पाण्याची चणचण संपणार, नव्या धरणाची होणार निर्मिती !

प्रेग्नेंसी नंतर Alia Bhatt घेतेय ‘ही’ थेरपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss