Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Loksabha Election 2024 च्या पहिल्या टप्प्याला देशभरात सुरुवात, सकाळपासूनच मतदानासाठी देशवासियांचा उत्साह

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आजपासून (शुक्रवार, १९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली असून आजपासून (शुक्रवार, १९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. देशभरात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान पार पडत असून एकूण १०२ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. मुख्यत्वे एनडीए (NDA) विरुद्ध इंडिया आघाडी (INDIA Alliance) अशी थेट लढत देशभरात लढली जाणार आहे. तामिळनाडू राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडत असून महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान पार पडत असून, तामिळनाडूमध्ये ३९ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याशिवाय,उत्तर प्रदेशात ८, बिहारमध्ये ४, राजस्थानमध्ये १३, मध्य प्रदेशात ६, आसाम मध्ये ५, उत्तराखंड येथे ६, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश येथे प्रत्येकी २, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम य राज्यांमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडत असून जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे.

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान पार पडत असून नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया आणि चंद्रपूर येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. गडचिरोली येथे साडेसात ते तीन वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. गडचिरोली मतदारसंघ संवेदनशील भागात येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या वेळेत मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून मतदान सुरु होण्याआधी सर्व मतदान केंद्रांवर मॉक पोल केले गेले आहे. ईव्हीएम मशीनच्या चाचणीसाठी हे मॉक पोल घेतले गेले आहे.

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान पार पडत असून प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे. चंद्रपूर येथून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. रामटेक येथून शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे तर भंडारा – गोंदिया येथून भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे निवडणूक लढवत आहेत. गडचिरोली – चिमूर या मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाण असा सामना होत आहे.

हे ही वाचा:

‘असं’ चेक करा तुमचं मतदार यादीतील नाव…

LOKSABHA ELECTION चा पहिला टप्पा, ‘इतके’ नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss