Wednesday, May 1, 2024

Latest Posts

‘असं’ चेक करा तुमचं मतदार यादीतील नाव…

जरी मागच्या वर्षी तुमचं नाव मतदार यादीत असलं तरी या वर्षीही ते चेक करने गरजेचं आहे. या मतदार याद्या वेळोवेळी अपडेट होत असतात. दरवर्षी यादीत काही ना काही बदल झालेले असतात. काही वेळा चुकीचं नाव किंवा चुकीचा पत्ता येऊ शकतो.काही वेळा चुकीने तुमचं नाव नसूही शकत. यासाठी आधीच पाहून तो चेक करणं गरजेचं असत.

देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहे. १९ एप्रिल ते १ जून पर्यंत देशभरात निवडणूक सुरु असणार आहे. ७ टप्प्यांमध्ये या निवडणूका पार पाडल्या जाणार आहेत. ४ जूनला मतमोजणी पार पडणार आहे. ४ जूनलाच निकाल ही बाहेर येईल. म्हणून निवडणुकीच्या अगोदर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करणं महत्त्वाचं ठरेल. जर ऐन वेळी मतदान यादीत नाव सापडलं नाही, तर मात्र मतदान करता येणार नाही. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६एप्रिल, ७मे, १३मे आणि २० मे रोजी मतदान होईल.

मतदार हा मतदानासाठीचा सर्वात मोठा घटक असतो. मतदाराशिवाय आपला नेता कोण हे निवडता येणार नाही. जरी मागच्या वर्षी तुमचं नाव मतदार यादीत असलं तरी या वर्षीही ते चेक करणे गरजेचं आहे. या मतदार याद्या वेळोवेळी अपडेट होत असतात. दरवर्षी यादीत काही ना काही बदल झालेले असतात. काही वेळा चुकीचं नाव किंवा चुकीचा पत्ता येऊ शकतो. काही वेळा चुकीने तुमचं नाव नसूही शकतं. यासाठी आधीच पाहून तो चेक करणं गरजेचं असतं. आधीच मतदार यादी चेक केल्यानंतर जर काही चूक असेल तर तुम्ही निवडणुकीच्या १० दिवस आधीपर्यंत ती अपडेट करून घेऊ शकता.

मतदार यादीतील तुमचं नाव चेक करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळावर जाऊन प्रथम Search In Electral Roll यावर क्लिक करा. नंतर ‘Search by Detail’, ‘Search by Epic’ किंवा ‘Search by Mobile’ या तिन्हीपैकी एकावर क्लिक करा. आवश्यक माहिती व कॅप्चा कोड टाकून सर्च करा. यानंतर तुम्हाला यादीतील तुमचं नाव दिसेल. जर तुम्हाला तुमचे नाव दिसत नसेल तर भरलेली माहिती पुन्हा एकदा चेक करून पहा आणि तरीही नसेल दिसत तर राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधा. तुम्ही एसएमएसद्वारे देखील तुमचं नाव तपासू शकता. यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा आणि तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक समाविष्ट करा. हा मेसेज ९२११७२८०८२ किंवा १९५० या क्रमांकावर पाठवा. याचे उत्तर तुम्हाला एसएमएसमध्येच मिळेल. तुमचे नाव यादीत नसल्यास ‘नो रेकॉर्ड फाउंड’ असा मेसेज येईल. आपला मतदानाचा हक्क बजावायला मात्र विसरू नका.

हे ही वाचा:

आंब्याची कुल्फी तर खूप आवडते पण बनवायची कशी?

Eknath Shinde यांच्या Shivsena कडून आचारसंहिता भंग, Congress ची EC कडे तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss