Saturday, July 27, 2024

Latest Posts

MVAचा जागावाटपाचा तिढा सुटला, ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) शिवसेना उबाठा २१ (Shivsena UBT), काँग्रेस १७ (Congress) तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस १० (NCP Sharad Pawar) जागांवर लढणार आहे. आज (मंगळवार, ९ एप्रिल) झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय सांगण्यात आला. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे उपस्थित होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.

मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्यानुसार महाविकास आघाडी ४८ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना उबाठा पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेस १७ जागांवरून लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष १० जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बहुचर्चित सांगली आणि भिवंडी मतदारसंघामधील जागेवरून झालेला तिढा संपला असून सांगली मतदारसंघातून शिवसेना उबाठा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर, भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढणार आहेत. मुंबईतील सहा मतदारसंघापैकी मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर या जागांवरून काँग्रेस लढणार असून उर्वरित चार जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत.

या २१ जागांवरून शिवसेना लढणार

महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेना उबाठा पक्ष २१ जागांवरून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

  • दक्षिण मुंबई
  • दक्षिण मध्य मुंबई
  • उत्तर पश्चिम मुंबई
  • ईशान्य मुंबई
  • जळगाव
  • परभणी
  • पालघर
  • नाशिक
  • कल्याण
  • ठाणे
  • रायगड
  • मावळ
  • धाराशिव
  • रत्नागिरी – सिंधुदुर्ग
  • बुलढाणा
  • हातकणंगले
  • छत्रपती संभाजीनगर
  • शिर्डी
  • सांगली
  • हिंगोली
  • यवतमाळ – वाशीम

काँग्रेस या १७ जागांवरून लढणार

  • नंदुरबार
  • धुळे
  • अकोला
  • अमरावती
  • नागपूर
  • भंडारा – गोंदिया
  • गडचिरोली – चिमूर
  • चंद्रपूर
  • नांदेड
  • जालना
  • पुणे
  • उत्तर – मध्य मुंबई
  • उत्तर मुंबई
  • सोलापूर
  • कोल्हापूर
  • रामटेक
  • लातूर

राष्ट्रवादीच्या या १० जागा

  • बारामती
  • शिरूर
  • सातारा
  • भिवंडी
  • दिंडोरी
  • माढा
  • रावेर
  • वर्धा
  • अहमदनगर दक्षिण
  • बीड
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss