Sunday, May 19, 2024

Latest Posts

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा, ‘या’ मतदारसंघांमध्ये होणार चुरशीची लढत

सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार असून महाराष्ट्रात ११ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे

सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार असून महाराष्ट्रात ११ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये ७ मे रोजी बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी मतदान पार पडणार असून उमेदवारांचे प्रचार आता थंडावले आहेत. गेल्या महिन्यापासून प्रत्येक उमेदवार प्रचारांमध्ये व्यस्त होते. प्रत्येक उमेदवाराने आपले मुद्दे मतदारांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार लढणार आहे ते पाहूया.

१.बारामती

   महाविकास आघाडी- सुप्रिया सुळे

    महायुती- सुनेत्रा पवार

२. रायगड

     महायुती- सुनील तटकरे

     महाविकास आघाडी – अनंत गीते

३. उस्मानाबाद

    महाविकास आघाडी- ओमप्रकाश राजे निंबाळकर

     महायुती- अर्चना पाटील

४. लातूर

     महाविकास आघाडी- शिवाजीराव काळगे

      महायुती- सुधाकर शृंगारे

५. सोलापूर

     महाविकास आघाडी- प्रणिती शिंदे

      महायुती- राम सातपुते

६. माढा

     महाविकास आघाडी- धैर्यशील मोहिते पाटील

      महायुती- रणजितसिंह नाईक- निंबाळकर

७. सांगली

     महाविकास आघाडी- चंद्रहार पाटील

     महायुती- संजयकाका पाटील

      अपक्ष – विशाल पाटील

८. सातारा

     महाविकास आघाडी- श्रीनिवास पाटील

      महायुती- उदयनराजे भोसले

९. रत्नागिरी-सिंधुदुर्ग

     महाविकास आघाडी- विनायक राऊत

     महायुती- नारायण राणे

१०. कोल्हापूर

     महाविकास आघाडी- शाहू छत्रपती महाराज

      महायुती- संजय मंडलिक

११. हातकणंगले

     महाविकास आघाडी- सत्यजित पाटील

     महायुती- धैर्यशील माने

     स्वाभिमानी शेतकरी संघटना- राजू शेट्टी  

हे ही वाचा:

बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात राडा; कार्यकर्ते आक्रमक Mahayuti च्या जाहिरातींवरून Congress नेते Atul Londhe यांची निवडणूक आयोगात तक्रार Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss