Saturday, May 18, 2024

Latest Posts

Mahayuti च्या जाहिरातींवरून Congress नेते Atul Londhe यांची निवडणूक आयोगात तक्रार

महायुतीतर्फे (Mahayuti) आज (रविवार, ५ मे) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातींवर आता काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला असून महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली. अतुल लोंढे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती विरोधात तक्रार केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, “पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणिव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. आज एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर कुठे जल्लोष व्हायला पाहिजे हे भारतात की पाकिस्तानात हे पाहून मतदान करा अशी जाहिरात दिली आहे भाजपसोबत त्यांचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी ही जाहिरात दिली आहे.”

पुढे ते म्हणाले, “पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्यानी खाणारा पंतप्रधान पाहिजे की मणिपूर मध्ये जाऊन पीडितांची सांत्वन करणारा पंतप्रधान पाहिजे अशी आम्ही जाहिरात देऊ शकतो. पण आमच्याकडे कार्यक्रम आहे, भाजपकडे शाही कार्यक्रम नाही. आम्ही भाजपा विरोधात आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिका-याकडे तक्रार केली. आम्ही यापूर्वी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी राम सातपुते, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात तक्रार केली होती.”

यावेळी अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला कारवाई करायला एवढा वेळ का लागतो याबाबत आम्ही विचारणा केली असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे दिले आहेत असे स्पष्ट केले. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या उमेदवारी रद्द करावी अशी मागणी त्यांनी राज्याच्या निवडणूक अधिका-याकडे केली.

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

“राज ठाकरेंचा देव बदलु शकतो” ;संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss