Sunday, May 19, 2024

Latest Posts

Loksabha election 3rdphase: राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८.टक्के मतदान

सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील, माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, आ.रोहित पाटील आणि इतर नेत्यांनी सहकुटुंब मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. ११ मतदारसंघातील मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली असून अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर या ११ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत एकूण किती टक्के मतदान झाले आहे हे पाहुयात..

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर – २०.७४ टक्के

सांगली – १६.६१ टक्के

बारामती – १४.६४ टक्के

हातकणंगले – २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदुर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान झाले आहे. तर कोल्हापूरात सर्वाधिक मतदान झाले असून बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार(Sunetra pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला. सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील(Vishal patil), मंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj chavan), महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar patil), आ.रोहित पाटील(Rohit patil ) आणि इतर नेत्यांनी सहकुटुंब मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

हे ही वाचा:

जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंच नाव…. CM Eknath shinde यांचा गौप्यस्फोट

पराभवाच्या भितीने Narendra Modi यांच्या तोंडी हिंदू-मुस्लीम, पाकिस्तानची भाषा, Ramesh Chennithala यांचे टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss