Friday, May 17, 2024

Latest Posts

Jayant Patil यांनी घेतली ‘या’ शिंदे समर्थक आमदाराची भेट, Hatkanangale मतदारसंघात होणार मोठा ‘राजकीय’ भूकंप?

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागला असून, महायुतीत (Mahayuti) काही जागांवरून तिढा कायम आहे. अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravkar) यांची भेट घेतली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangale Loksabha Election) महाविकास आघाडीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समजते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकर यांची त्यांच्या घरी जयसिंगपूर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी, जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचे पुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) हेदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत असून जयंत पाटील यांनी राजेंद्र यड्रावकर यांना मविआचे शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे, अश्या चर्चा आहेत.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजेंद्र यड्रावकर हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते.मात्र, २०१९ लोकसभा निवणुकीत राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते निवडूनही आले होते. नंतर त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा दिला होता. आता मात्र राजेंद्र यड्रावकर हे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. महायुतीत अपक्ष आमदारांना चर्चेत सहभागी करून घेत नसल्यावरून त्यांची नाराजी होती. अश्यातच, त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss