Tuesday, May 21, 2024

Latest Posts

PM Narendra Modi यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका, Parbhani, Nanded येथे आज प्रचारसभा

सध्या पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत वर्ध्यानंतर आता नांदेड आणि परभणीमध्ये मोदींची सभा होणार आहे. नांदेड येथे १० वाजता तर परभणी येथे १२ वाजता नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सध्या निवडणुकीचे वारे संपूर्ण देशभरात वाहत आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारामध्ये गुंतला आहे. त्यातच, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत वर्ध्यानंतर आता नांदेड आणि परभणीमध्ये मोदींची सभा होणार आहे. नांदेड येथे १० वाजता तर परभणी येथे १२ वाजता नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. नियोजित सभांच्या वेळेमध्ये बदल झाल्यामुळे नांदेड येथे त्यांची पहिली सभा तर परभणी येथे दुसरी सभा होणार आहे.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी मोदींच्या सभेच्या नियोजनासंदर्भात माहिती देताना सांगितले कि २० एप्रिल रोजी पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा नांदेड येथे १० वाजता व त्यानंतर १२ वाजता परभणी मध्ये त्यांची सभा होईल. परभणीतील सभेसाठी मोदींबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असतील. परभणीची जागा निश्चितपणे ‘महादेव जानकर’ हे दोन लाख मताधिक्याने जिंकतील असा विश्वासही भागवत कराडांनी दाखवला आहे.

नुकतीच नांदेड मध्ये मोदींची सभा पार पडली. नांदेडमध्ये या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. लाखावर लोक सभेसाठी उपस्थित होते. साडे दहा वाजता मोदींचे नांदेड मध्ये आगमन झाले होते. हजारो पोलीस मोदींच्या सुरक्षेततेसाठी तैनात करण्यात आले होते. मोदींनी सभेमध्ये काँग्रेस वर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले ‘काँग्रेस म्हणजे विकासाच्या वाटेवरील भिंत आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी अगोदरच हार मान्य केली आहे, ४जून नंतर इंडिया आघाडीवाले एकमेकांचे कपडे फाडतील.’ मत कुणालाही द्या पण मतदान मात्र नक्की करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

हे ही वाचा:

PM Narendra Modi लाईव्ह, Nanded मधून विरोधकांवर केला जोरदार हल्लाबोल

जनतेचे मुद्दे नसल्यानेच श्रीरामाच्या, धर्माच्या नावावर Narendra Modi मत मागतात, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss