Friday, May 3, 2024

Latest Posts

PM Narendra Modi लाईव्ह, Nanded मधून विरोधकांवर केला जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (शनिवार, २० एप्रिल) नांदेड (Nanded) येथे सभा पार पडत आहे. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून करत उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मत कुणालाही द्या, पण मतदान जरूर करा. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान झाले असून पहिल्याच टप्प्यात मतदारांनी विरोधकांना नाकारलं.”

पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस गरीब, दलित, वंचित, मजदूर, शेतकरी यांच्यामध्ये नेहमीच एक भिंत म्हणून उभी राहिली आहे. आज आमचे सरकार गरिबांसाठी काही काम करत असेल तर काँग्रेस त्याची खिल्ली उडवते. आम्ही जे बोललॊ ते आम्ही पूर्ण केले. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी काँग्रेसचे परिवार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काँग्रेसलाच वोट देणार नाहीत. काँग्रेसमुळे येथील शेतकरी गरीबच राहिले. उद्योग-धंदे यांच्याशी जोडलेल्या संभावना समाप्त गेल्या म्हणून लाखो युवांना पलायन करावे लागले.”

“तुम्ही मतदान कुणालाही करा, पण मतदानाचा हक्क जरूर पूर्ण करा. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच पराभव मान्य केला आहे. ४ जूननंतर ‘इंडिया आघाडी’ वाले एकमेकांचे कपडे फाडणार आहेत. गेल्या १० वर्षांत आम्ही केलेली कामे म्हणजे फक्त एक ट्रेलर आहे. मोदीने काश्मीरमधून कलाम ३७० हटवण्याची गॅरंटी दिली आणि ती पूर्ण केली. तीन तलाक बंद करण्याची गॅरंटी दिली आणि ती पूर्ण केली. भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याची गॅरंटी दिली आणि ती पूर्ण केली. आता भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची गॅरंटी आहे आणि ती पूर्ण करणारच.”

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका, Parbhani, Nanded येथे आज प्रचारसभा

जनतेचे मुद्दे नसल्यानेच श्रीरामाच्या, धर्माच्या नावावर Narendra Modi मत मागतात, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss