Monday, May 13, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil यांची मोठी घोषणा, सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी न झाल्यास…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने तात्काळ सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election 2024) २८८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतः देखील उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बीडमधील सिरसमार्ग येथे एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजप (BJP) नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Loksabha Constituency) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यादेखील उपस्थित होत्या. जरांगे पाटील हे थेट हॉस्पिटलमधून कार्यक्रमस्थळी आल्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपुसदेखील केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राज्य सरकारने तात्काळ सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवणार असून मी स्वतःदेखील निवडणुकीला उभा राहणार आहे. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नसून आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध केला. त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही.”

“लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार आहोत. याची तयारी एक महिन्यापासून सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. नरेंद्र मोदींना (Narendra Modi) देखील स्वतःचा प्रचार सोडून इतर नेत्यांचा प्रचार करावा लागत आहे. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. पण मराठा समाज एकटवल्याची भीती असल्यामुळे मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावे लागत आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

“देशाची घटना बदलण्यासाठी मोदींचा ४०० पार चा नारा”; शरद पवारांचा हल्लाबोल 

“Amit Shah आणि Yogi यांनी कोकणात येऊ नये”; भास्कर जाधवांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss