Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Congress मध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या, PM Modi यांची Sharad Pawar, Uddhav Thackeray यांना मोठी ऑफर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर देत, 'काँग्रेससोबत जाण्यापेक्षा आमच्यासोबत या,' असे वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (शुक्रवार, १० मे) नंदुरबार येथे सभा पार पडली. महायुतीच्या उमेदवार हिना गावित (Heena Gavit) यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली होती यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठी ऑफर देत, ‘काँग्रेससोबत जाण्यापेक्षा आमच्यासोबत या,’ असे वक्तव्य केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चा रंगू लागल्या होत्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रिय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असून त्यांनी अनेक लोकांसोबत चर्चा करून हे वक्तव्य केले असावे असे मला वाटत. चार जून नांतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनात टिकून राहायचं असेल तर छोट्या छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं त्यांना वाटत आहे.”

“याचाच अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. म्हणौनीच त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत यावे आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबत यावे,” असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता यावर विरोधक काय बोलणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांनी हार मानली का? Eknath Shinde यांचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray आतंकवादांच्या मदतीने मत मागतात, Ashish Shelar यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss