Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Sharad Pawar यांनी हार मानली का? Eknath Shinde यांचे वक्तव्य चर्चेत

कल्याण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल (गुरुवार, ९ मे) शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला केला.

कल्याण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल (गुरुवार, ९ मे) शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासह अनेक महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “दहा वर्षात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेऊन ते आमच्या पक्षात येत आहेत. ताकदीचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याने आमचा पक्ष मजबूत होत आहे,” असे वक्तव्य केले.

कल्याण ग्रामीणमधील उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांनी आज मधुकर शेळके, प्रदीप चुडनाईक, गिरीश काळण, मधुरा खेडकर, सरिता वाघेरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “२७ गावातील संघर्ष समितीचे दत्ता वझे, उपसरपंच, सरपंच, गुलाब वझे यांनी आज खऱ्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. न्यायहक्कासाठी संघर्ष करणारी ही समिती आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश होतो आहे. दररोज कल्याण लोकसभा मतदार संघातून विविध पक्षातून पदाधिकारी शिवसेनेत दाखल होत आहेत. दहा वर्षात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेऊन ते आमच्या पक्षात येत आहेत. ताकदीचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याने आमचा पक्ष मजबूत होत आहे.”

शरद पवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “शरद पवार म्हणत आहेत की प्रादेशिक पक्षाने काँग्रेस मध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का? उबाठा आधीच लीन होती,आता विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे, काँग्रेसीकरण २०१९ लाच झालेल आहे,त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. घोडा मैदान लांब कुठे आहे, शेवटचा टप्पा २० तारखेला आहे आणि चार तारखेला मतमोजणी आहे. तिन्ही टप्प्यांवर महायुती आघाडीवर आहे. विकासाच्या कामाची पोचपावती देशातील आणि महाराष्ट्रातील जनता जरूर देईल. एका वक्तव्यवरून ते वक्तव्य बदलत असतात.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईत होणार आहे. त्यावरून बोलताना ते म्हणाले, “महायुतीची सभा शिवाजी पार्कवरच होईल. मोदींचा रोड शो होणार आहे, ते जिथे जातात तिथे माणसच माणसं असतात. त्यांच्या स्वागताला मुंबई आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी तयार आहेत.”

हे ही वाचा:

डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निकाल; दोघांना जन्मठेप तर तिघे निर्दोष

Uddhav Thackeray आतंकवादांच्या मदतीने मत मागतात, Ashish Shelar यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss