Friday, July 26, 2024

Latest Posts

नारायण राणेंसाठी Raj Thackeray यांची जाहीर सभा

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे ४ मे रोजी सिंधुदुर्गाल्या कणकवली येथील उपरुग्णालयाच्या समोरच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहे

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर राज्याच राजकारण वेगळ्याच दिशेला गेल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भर सभेत कौतुक करून एनडीए सह महायुतीला पाठिंबा दिला आणि महायुतीच्या प्रचार सभेत मनसे नेते सहभागी होत गेले. लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झालेय. आता तिसऱ्या टप्प्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहेत.

काही वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे नारायण राणे (Narayan Rane) आणि राज ठाकरे(Raj Thackeray) हे शिलेदार होते. २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडून मनसे हा नवा पक्ष स्थापन केला. या दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी मैत्री ही कायम होती. २००९ ला राज ठाकरे यांनी लोकसभा स्वतंत्र लढवली आणि त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि तब्बल दहा वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे.

 

गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांच्या विरोधात असलेले राज ठाकरे यावर्षी महायुतीसोबत आहेत. राज ठाकरे वगळता मनसेचे कार्यकर्ते महायुतीला भक्कम पाठिंबा देत असल्याचे दिसते.राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यामुळे महायुतीला अधिक बळ मिळालं आहे. स्पष्टवक्तेपणा आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणून राज ठाकरेंची ओळख आहे.६ मे 2023 रोजी रत्नागिरीत मनसेचा जाहीर मेळावा होता आणि त्यावेळी बारसू रिफायनरी प्रकल्प संदर्भात राज ठाकरे यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं. मुंबई प्रमाणे कोकणातील स्थानिकांना हक्क मिळावा या विषयावर सुध्दा राज ठाकरे यांनी थेट भाष्य केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 2014 मध्ये ते शेवटची निवडणूक लढवली होती. त्यानंतर वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर ते निवडणुकीत उभे राहिले नाही. तब्बल ९ वर्षानंतर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. गेले २ टर्म खासदार असलेले विनायक राऊत(Vinayak Raut)हे त्यांच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या विजयाची हॅट्रिक रोखणं हे राणेंच्या हातात आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मेळाव्याचे आयोजित केली होते. त्या वेळी नारायण राणे यांनी खंत व्यक्त करत म्हणाले होते की, येत्या ७ तारखेच्या आत राज ठाकरे सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो. आणि या भाषणानंतर येत्या ४ मे रोजी राज ठाकरेंची तोफ रत्नागिरीत धडकणार हे निश्चित झालं.

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे ४ मे रोजी सिंधुदुर्गाल्या कणकवली येथील उपरुग्णालयाच्या समोरच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहे.शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवला आहे. मात्र उद्या होणाऱ्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांच्या विषयी राज ठाकरे काय बोलणार आणि यांच्या सभेनंतर कोकणातल्या मतदारांवर काय प्रभाव पडणार हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss