Saturday, May 18, 2024

Latest Posts

“मी दोन दिवसात स्फोट करेन, तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे”;संजय राऊतांचा इशारा

"मोदी आणि शाह यांनी मिळून महाराष्ट्र तोडण्याचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे तुकडे करण्याचं, माणसाला विकत घेण्याचं, दहशत निर्माण करण्याचं, मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रचलं ते यशस्वी झालं नाही.अशा शब्दात मोदींवर ताशेरे ओढले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच शाब्दिक वार सुरु आहे. सत्ताधारी नेते विरोधकांविरोधात काही पुरावे देत पत्रकार परिषदेत टीका करताना दिसत आहेत. अशात शिवसेना उद्धव ठाकरे गटा (Shivsen UBT )चे नेते  आणि खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांनी “मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण”असे ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

“मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण! नाशिक महानगरपालिकाहद्दीत ८०० कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत.” असे म्हणत “मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन तो पर्यंत लाभार्थीनी शांत झोपावे.”असे ही त्यांनी ट्विटमध्ये म्हटंले आहेत.

महाराष्ट्र कोण लुटत आहे ? असा प्रश्न विचारत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CMEknathshinde),उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendrafadanvis),पंतप्रधान नरेंद्र मोदी(PMNarendramodi) यांच्यासह भाजप नेत्यांना जाब विचारला आहे. दरम्यान, आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत “मोदी आणि शाह यांनी मिळून महाराष्ट्र तोडण्याचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे तुकडे करण्याचं, माणसाला विकत घेण्याचं, दहशत निर्माण करण्याचं, मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रचलं ते यशस्वी झालं नाही.अशा शब्दात मोदींवर ताशेरे ओढले.

तर, “मोदी यांनी बारामतीत येऊन दोन दिवस राहावं आणि अभ्यास करावा. कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पहावं आणि मग स्वतःच कुटुंब कुठे आहे? हे शोधावं. पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही, महाराष्ट्रातील अनेक घर हे त्यांचे कुटुंब आहे.” उद्या आम्ही सत्तेत येऊ आणि त्यांना जाब विचारू, त्यांच्यावर खटले दाखल करू, त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल या भीतीतून ते सगळं करत आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोदी यांना त्यांची जागा दाखवायच्या भीतीमध्ये ठामपणे उभा आहे.”

हे ही वाचा:

Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss