Sunday, May 19, 2024

Latest Posts

“पाकिस्तानची भाषा करणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे”; फडणवीसांची विडेट्टीवारांवर टीका

" शहिद हेमंत करकरेंचा अपमान करायला काँग्रेस मागेपुढे बघणार नाही. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधकांवर खडसावले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप- प्रत्यारोपाचे वारे सुरुच आहे. सत्ताधारी हे विरोधकांना धारेधर धरत असून शाब्दिक वार करत आहेत. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार(Vijay wadettiwar) यांनी ” उज्वल निकम हा बेईमान माणुस आहे. वकिल नसुन देशद्रोही आहे” असा महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्यावर आरोप केले. तर शहिद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही कसाबच्या बंदुकीमधील गोळी नव्हती तर ती आर.एस.एस समर्पित पोलिस अधिकाऱ्याची होती असे ही ते म्हणाले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendrafadanvis ) यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देत म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत आणि देशातील न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत”

पुढे ते म्हणाले की,”सुरुवातीला पाकिस्तानची जनता बोलत होती कि, कसाबने काही केलेलं नाही पण कसाब आमचा रहिवाशी होता हे पाकिस्तानला देखील मान्य करावं लागलं. आणि त्यानेच अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत.२००८ साली मुंबईवर हल्ला झाला तेव्हापासून २०१४ पर्यंत महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेसचं सरकार होतं. आज विरोधी पक्ष नेते अशी वक्तव्य करत आहेत ज्यामुळे याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे.”

” शहिद हेमंत करकरेंचा अपमान करायला काँग्रेस मागेपुढे बघणार नाही. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधकांवर खडसावले. दरम्यान, आज सर्वत्र प्रचारसभाची सांगता होत होती. प्रचारादरम्यान २६ -११ चा घटना काढल्याने निवडणुकीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

BJP काम करो अथवा न करो,आम्ही… Gulabrao Patil यांचे मोठे वक्तव्य

Mahayuti च्या जाहिरातींवरून Congress नेते Atul Londhe यांची निवडणूक आयोगात तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss