Tuesday, May 21, 2024

Latest Posts

कॉंग्रेसने ६० वर्षात केलं नाही ते आम्ही १० वर्षात करुन दाखवलं; मोदींची कॉंग्रेसवर टीका

"जनतेची लूट करण्याचा कॉंग्रेसचा उद्देश आहे.कॉंग्रेसला ६० वर्षापर्यंत राज्य करण्याची वेळ दिली मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देखील दिले नाही.

सोलापूर माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी माळशिरस येथे जाहीर सभा घेतली. मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात येऊन मोदींनी कॉंग्रेस सह विरोधकांना लक्ष केले. “येळकोट येळकोट जय मल्हार, बाळूमामाच्या नावानं चांगभलं” असं म्हणत मराठीभाषेतून सभेला सुरुवात केली. “जनतेचं प्रेम खुप मोठं असतं. नेते उशिरा येण्याची जनतेला सवय असते ,पण मी वेळेत पोहोचतो”. “६० वर्षात कॉंग्रेस काहीच करु शकलं नाही.कॉंग्रेसने (Congress) जे ६० वर्षात केलं नाही ते आम्ही १० वर्षात केले.शरिराचा कण-कण आणि जीवनाचा प्रत्येक क्षण हा देशाला समर्पित केले आहे.आम्ही खुप गोष्टी या १० वर्षात करुन दाखवल्या.२५ कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढलं.जर कोणी दिलेलं वचन पूर्ण केलं नाही तर महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवतं.”असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की,”रेल्वे, रस्त्यांवर अभूतपूर्व काम केलं.महायुती सरकार महाराष्ट्रात चांगलं काम करत आहे.देशात पाणी पोहोचवायचं हा आमचा संकल्प आहे.पुढील ५ वर्षात देशभरात साठवणूक केंद्र उभारणार. ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार ही मोदीची गॅरंटी आहे. २०१४ मध्ये सरकार बनल्यानंतर आमची पूर्ण ताकद ही सिंचनावर आहे.”असे ही ते म्हणाले.

“जनतेची लूट करण्याचा कॉंग्रेसचा उद्देश आहे.कॉंग्रेसला ६० वर्षापर्यंत राज्य करण्याची वेळ दिली मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देखील दिले नाही.कॉंग्रेसने ६० वर्षात जेवढा निधी खर्च केला तेवढा निधी आम्ही १० वर्षात खर्च केला.”अशा शब्दात कॉंग्रेसवर टीका केली तर “त्या नेत्याने माढ्यात पाणी दिलं का ? आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. इथे मोठे नेते कृषी मंत्री असताना ऊसाचा एफआरपी वाढावा यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्या नेत्यांनं आश्वासन देऊनही पाणी दिलं नाही.म्हणूनच आज इथून निवडणूक लढवायची त्या नेत्यात हिमंत नाही. अशा शब्दात मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर बोचरी टीका केली.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातुन गुजरातला उद्योगधंदे पळवलात आता निवडणूकीत महाराष्ट्र आठवला का? Nana Patole यांचा PM Modi यांना सवाल

जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, PM Narendra Modi यांचे साताऱ्यातून विरोधकांवर टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss