Thursday, May 16, 2024

Latest Posts

जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, PM Narendra Modi यांचे साताऱ्यातून विरोधकांवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर घणाघात केला. यावेळी विरोधकांवर टीका करत ते म्हणाले, “जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, काँग्रेस तुमच्या आई बहिणींचे दागिनेही नाही ठेवणार,” असे म्हणत विरोधकांवर घणाघाती टीका केली.

आपल्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले, “कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या जनतेला माझा नमस्कार… मी इथे तुमचा आशिर्वाद घ्यायला आलो आहे. साताऱ्याची भूमी ही शोर्याची भूमी आहे. सातारा मध्ये भगवा फडकतच राहणार. आम्ही शिवरायांचे विचार जगण्याचा विचार करतो.  इतक्या वर्षानंतर नौदलाच्या झेंड्यामध्ये इंग्रजांचे निशाण होते NDA सरकारने आणि मोदी सरकारने ते निशाण हटवले. मोदी सरकारने नौदलाच्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला स्थान दिले. आम्ही सैनिकांसाठी वन रॅंक, वन पेन्शनची योजना काढली. आमच्या सरकारमध्ये १ लाख रुपये पेन्शन सैनिकांना दिलं. कॉंग्रेसने वन रॅंक, वन पेन्शन दिली का ? खोट बोलण्यात कॉंग्रेस मास्टर आहे.”

“मोदी सरकारने ३७० कलम हटवलं. बाबासाहेबांचे संविधान जम्मू-काश्मिरचा लागू नव्हती. काँग्रेसने जम्मू- काश्मिरमध्ये संविधान लागू का केले नाही. काश्मिरमधील ३७० कलम हटवल्याने त्यांना हक्क मिळाला आहे. बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत धर्माच्या नावाखाली आरक्षण मिळू देणार नाही. कर्नाटकात कॉंग्रेसने मुस्लिमांना २७ टक्के आरक्षण ओबीसीतून दिले. विरोधक फेक व्हिडिओ बनवून खोटं पसरवत आहेत. निवडणूक आयोगाने खोट्या व्हिडिओ बनवण्याऱ्यावर कारवाई करावी.”

यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीदेखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेत येणार आणि भारताचा विकास करणार. शिवरायांचे विचार हे मोदींनी अंमलात आणले. भाजपचे विचार हे लोककल्याणाचे विचार आहेत. मविआमध्ये अजूनही वाद होत आहेत. कोण पंतप्रधान होणार यावरुन विरोधकांमध्ये वाद सुरु आहेत. विरोधकांची वाटचाल ही विकासाकडे नाही तर अधोगतीकडे आहे. यांची महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी आहे.”

हे ही वाचा:

“पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल”;PM Narendra Modi यांची इंडियावर टीका

PM Narendra Modi यांची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss