Tuesday, May 14, 2024

Latest Posts

निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता का लागू होते? जाणून घ्या सविस्तर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू केली जाते. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान महाराष्ट्रात मतदार होणार आहे. त्यानंतर ४ जूनला मतदानाचा निकाल जाहीर होईल. पण तुम्हाला माहित का निवडणुकीपूर्वी आचारसंहिता का लागू केली जाते? चला तर जाणून घेऊया…

देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे बोलले जाते. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते.भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अन्वये संसद आणि राज्य विधानमंडळांच्या मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका आयोजित करण्याचे आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने केंद्र आणि राज्यांमधील सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी त्याचे पालन करणे सुनिश्चित करणे आवश्यक केले आहे. नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. त्यामुळे आचार संहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे.

देशभरात आचार संहिता लागू झाल्यानंतर अनेक नियमही लागू केले जातात. कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता, या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. शिवाय, निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी, गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवहार, लाचखोरी आणि मतदारांना धमकावणे, भीती घालणे यांसारखे गुन्हे घडू नये म्हणून काळजी घेतली जाते. याचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई केली जाते. एखादी व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्यांच्याविरोधात कारवाई करू शकतो. तसेच उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखता येते . तसेच त्याच्याविरोधात FIRही दाखल केली जाऊ शकते. दोषी सिद्ध झाल्यास त्या संबंधित उमेदवाराला तुरूंगात जावे लागते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर UPSC परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss