Monday, May 13, 2024

Latest Posts

मुंबई विमानतळ कस्टमने एकाच दिवसात केले ६१ किलो सोने जप्त, ७ जणांना अटक

शुक्रवारी झालेल्या या जप्तीमध्ये किमान ७ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. ज्यात ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (Customs Department ) शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) ₹ ३२ कोटी किंमतीचे ६१ किलो सोने जप्त केले असून, शुक्रवारी झालेल्या या जप्तीमध्ये किमान ७ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. ज्यात ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या इतिहासातील एका दिवसातील ही सर्वाधिक जप्ती असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पहिल्या कारवाईत, टांझानियाहून परत आलेल्या चार भारतीयांकडे १ किलो सोन्याचे बार आढळून आले, जे त्यांनी अनेक खिशांसह खास डिझाइन केलेल्या पट्ट्यांमध्ये लपवून ठेवले होते,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिका-यांनी २८.१७ कोटी रुपये किंमतीचे ५३ किलो UAE-निर्मित सोन्याचे बार जप्त केले , जे प्रवाशांनी त्यांच्या कमरेभोवती घातले होते. दोहा विमानतळावर एका सुदानी नागरिकाने ट्रांझिट वेळेत हे पट्टे प्रवाशांना दिले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चार प्रवाशांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्याचप्रमाणे कस्टम अधिकार्‍यांनी दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून ₹ ३.८८ कोटी किंमतीचे ८ किलो सोने जप्त केले आहे.

या ७ जणांपैकी २ महिलांसह १ पुरुष सोन्याच्या बार्ससह सोन्याची धुळदेखील विमानतळावरून घेऊन जाताना पकडले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशांनी घातलेल्या जीन्सच्या पट्ट्यांमध्ये त्यांनी हे सोने कल्पकतेने लपवले होते.त्यापैकी एक महिला ६० पेक्षा जास्त वयाची होती आणि ती व्हीलचेअरवर होती. अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर या तिघांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी हे कतार एअरवेजच्या विमानाने मुंबईत आले होते. सर्व आरोपी प्रवाशी होते. त्यांना भारतात सोने आणण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते. परंतु, त्यांना भारतातील सीमाशुल्क कायद्याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे हे सर्व जण एवढं सोनं घेऊन भारतात आले होते.

हे ही वाचा:

PAK vs ENG, Final Match : टी२० विश्वचषक २०२२ इंग्लंडचाच, पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय

Juhi Chawla Birthday: तुम्हाला माहित आहे का सलमान आणि जुहीच्या लग्नाची ही कहानी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss