Sunday, May 19, 2024

Latest Posts

१ मेच्या सुट्टीनिमित्त शिर्डीचा प्लॅन केलात तर थांबा, १ मेपासून शिर्डी बंदची ग्रामस्थांची हाक

Shirdi Sai Baba temple will closed from May 1 : महाराष्ट्रातील लोकप्रिय देवस्थान असणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत साईंचे दर्शन घ्यायला भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून साईनगर शिर्डीत येत असतात. येऊ घातलेल्या १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनच्या पार्श्वभूमीवर आपण जर शिर्डीला जाण्याचे नियोजन केले असेल. तरी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Shirdi Sai Baba temple will closed from May 1 : महाराष्ट्रातील लोकप्रिय देवस्थान असणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत साईंचे दर्शन घ्यायला भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून साईनगर शिर्डीत येत असतात. येऊ घातलेल्या १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनच्या पार्श्वभूमीवर आपण जर शिर्डीला जाण्याचे नियोजन केले असेल. तरी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. १ मे पासून साईनगर शिर्डीमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल होऊ शकतात.

ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमागे मागील कारण असे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी व मंदिर प्रशासनाच्या काटेकोर बंदोबस्तासाठी सीआयएसएफची सुरक्षा पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुरक्षेमुळे स्थानिक ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो या अनुषंगाने या ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.

आता शिर्डीमध्ये साई संस्थानाचे स्वतःचे असे सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षारक्षक भाविकांच्या सेवेसाठी तैनात आहेत. परंतु सीआयएसएफची सुरक्षा जर मंदिर प्रशासनात लागू झाली तर त्यांचे नियम हे पूर्णतः वेगळे असतील. आणि त्या नियमांचा त्रास स्थानिक ग्रामस्थांना होऊ शकतो या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांकडून एक बैठक घेण्यात आली, आणि या बैठकीमध्ये शिर्डी बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद दरम्यान दर्शनाची व्यवस्था, साई संस्थानाच्या निवासाची व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था ही सुरू राहणार आहे. परंतु शिर्डी बंद असल्याने वाहतुकी सुविधेबरोबरच इतर सुविधांचा पुरवठा भक्तांना पुरवला जाणार नाहीये त्यामुळे शिर्डी येणाऱ्या भक्तांसाठी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हे ही वाचा : 

‘जोडे पुसणारे…’, उद्धव ठाकरेंच्या या टिकेला मुख्यमंत्री शिंदेंच प्रत्युत्तर

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ, काय आहेत अपघाताची नेमकी कारणं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss