Saturday, July 27, 2024

Latest Posts

बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या घरात सापडला ४० किलो गांजा

मागील काही आठवड्यांपासून बुलढाण्यातील लोणार(Buldhana Crime News) तालुक्यात पोलिसांनी गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे.

मागील काही आठवड्यांपासून बुलढाण्यातील लोणार(Buldhana Crime News) तालुक्यात पोलिसांनी गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे. जवळपास यामधून त्यांनी दीड कोटी रुपये जप्त केले आहेत. या सर्व ताज्या असताना मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावातील एका शेतकऱ्याच्या घरात गांजा आढळून आला आहे. गोपाळ मुंडाळे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या घरातून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्याला अटक केली आहे. तसेच अटक करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यामधील धामणगाव बढे येथील सिंदखेड लपाली या गावातील एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केली होती. ही लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या शेतात जाऊन छापेमारी केली, या छापेमारीमध्ये पोलिसांनी गांजाचे शेत शोधून काढले. त्यानंतर त्यांनी शेतामध्ये असलेल्या घराची झडती घेतली. या तपासामध्ये पोलिसांनी घरातून ४० किलो गांजा जप्त केला आहे. गोपाल मुंडाळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी २० डिसेंबर रोजी छापेमारी करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. गेल्या आठवड्यात लोणार तालुक्यात हत्ता शिवारात तुरीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे या जिल्ह्यात आणखीन ठिकाणी गांजा लागवड करण्यात आला आहे.

भारतामध्ये पूर्णपणे गांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक लोक चुकीच्या पद्धीतीने गांजाची लागवड करत आहेत. आपल्या देशात हजारो वर्षपासून गांजाचे सेवन केले जात आहे. १९८५ पर्यंत गांजावर कोणतीही बंदी घालण्यात आली आहे.पण राजीव गांधींचे सरकार आल्यानंतर एनडीपीएस कायदा आणण्यात आला. हा कायदा आणल्यानंतर गांजावर बंदी घालण्यात आली. तसेच गांजा बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. गांजाचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. पण गेल्या वर्षभरापासून गांजावरील बंदी हटवण्याची मागणी केली जात आहे. अनेकदा सरकारने शेतकरी नेत्यांनी गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील बैठक असफल

गुगलला आणखीन एक मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला ७० कोटी रुपयांचा दंड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss