Saturday, March 2, 2024

Latest Posts

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील बैठक असफल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे जीवाचे रान करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे जीवाचे रान करत आहेत. सरकारने स्थापन केलेले शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला आंतरवली सराटी गावात गेले आहे. त्यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून बराच वेळ चर्चा झाली पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील बैठक असफल ठरली आहे. नोंदी असलेल्या सबंधीत नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे, या मागणीवर मनोज जरांगे हे ठाम आहेत. पण असे करता येणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांची आजची ही बैठक असफल झाली आहे.

यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्हला हे आरक्षण द्याचे आहे. चर्चेची दार खुली असतील तर मार्ग सापडेल. सोयरा या शब्दावरून जरांगे आणि आमची वेगळी मते आहेत. विमल मुंदडा केसचा संदर्भ पाहता मुंदडा मुळच्या एससी होत्या. लग्नानंतर त्या मारवाडी झाल्या. त्यामुळे, ज्याच्याकडे कुणबी दाखले आहेत ते ओबीसी आहेत. त्यांच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांना आरक्षण देणे बंधनकारक आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. महिलेवरून तिच्या मुलांची जात ठरवता येत नाही. तर वडिलांच्या दाखल्यावरून मुलांची जात ठरते. शिंदेच्या अध्यक्षतेखाली रात्रंदिवस काम सुरु आहे. शेवटच्या माणसाची नोंद बघेपर्यंत कारवाई चालू राहणार आहे. महिना दीड महिन्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आम्हला मराठा समाजाला कायद्याने टिकणारे आरक्षण द्याचे आहे. मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जाणार आहेत त्याची माहिती मिळाल्यामुळे काळजी म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तसेच पोलिसांना देखील कायदा आणि सुव्यवस्थेनुसार काळजी घ्यावी लागणार, असे गिरीश महाजन म्हणाले.

त्यानंतर याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले, समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला समाज कमी पडला नाही. त्याचे शब्द तेच पाळत नाहीत. त्यांनीच लिहिलं आहे ते आम्हला कश्याला खोटं ठरवतील. घोषणा मोठी झाली, दरवाजा दिली पण कडी दिली नाही. १०० टक्के यातून मार्ग निघेल. कायद्याच्या चौकटीत जे बसत तेच आम्ही मागत आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

आज आहे Blue Christmas Day, पण म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ?

पुण्यातील भाजप नेत्याने उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेखाली आत्महत्या करत संपवले जीवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss