Saturday, July 27, 2024

Latest Posts

तुळजाभवानी मातेचे अलंकार गहाळ झाल्याप्रकरणी ७ जणांवर अखेर गुन्हा दाखल, ७ पैकी ५ आरोपी मयत

धाराशिव येथील तुळजाभवानी (Tulja Bhavani) मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार चोरी केल्याप्रकरणी आरोपींवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिव येथील तुळजाभवानी (Tulja Bhavani) मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार चोरी केल्याप्रकरणी आरोपींवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण सात लोकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या आरोपींमध्ये सात पैकी पाच जण हे मयत आहेत. तुळजाभवानी मातेच्या अलंकार चोरी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आरोपींची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल केले आहेत.

धाराशिव येथील तुळजाभवानी मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार चोरी प्रकरण विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. रात्री उशिरा पर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच जण मयत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मयत लोकांवर गुन्हे दाखल करून काय साध्या होणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणी आमदार महादेव जानकर यांनी सोमवार विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत, या प्रकरणी कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली होती. यावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्परतेने शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले होते. या सर्व प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले होते. त्यानंतर अकेह्र गुन्हे दाखल झाले आहेत.

तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणात मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी १३ डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तत्काळ गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीवर ठेवल्याचे सांगत चौकशीअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्याने अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मंदिर प्रशासनाचे कामकाज तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, असे असतांना गुन्हा दाखल करण्यात आलेल्या यादीत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव नाही.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत; मनोज जरांगे

Maharashtra Sadan Scam प्रकरणात आला नवा ट्विस्ट, छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss