Friday, March 1, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत; मनोज जरांगे

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असताना मनोज जरांगे हे अनेक नवनवीन मागण्या करत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असताना मनोज जरांगे हे अनेक नवनवीन मागण्या करत आहेत. त्यातच आता त्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका (Elections) होणार नाही आहेत, असे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असणार असल्याच्या चर्चेवर बोलतांना मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आचारसंहिता कधी लागतील मला माहित नाही. मात्र २४ तारखेच्या आतच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागो की २५ ला लागो, आमचा निर्णय २४ डिसेंबरलाच होणार आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात. त्यामुळे २४ डिसेंबरच्या आधीच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे. फेब्रुवारी आता खूप लांब आहे, असे जरांगे म्हणाले . मनोज जरांगे यांच्या पाचव्या टप्प्यातील आंदोलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणा दाखवणे आता आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी घेणं सोपं नाही. आमच्यातील समाधान प्रमाणे दोन शब्द घेणे आवश्यक होतं, ते ते घेतील. सरकारच्या कानावरती याबाबत मी घातले आहे. रक्ताच्या नातेवाईकासंदर्भात सरकारच्या अटी-शर्ती काय आहेत हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. माझे रात्री सरकारशी बोलणे झाले असून, मी कोणाशी बोललो हे २४ तारखेपर्यंत स्पष्ट करणार, असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

समाजाशी संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आजपासून पुन्हा जातोय. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यासाठी जात आहे, समाजाला डाग लागू द्यायचा नाही २३ तारखेला घराघरातील मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार आहे. सरकार आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी निर्णय मोठा घेतला त्यांच्या धाडसाचे कौतुक असल्याचे देखील जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

Maharashtra Sadan Scam प्रकरणात आला नवा ट्विस्ट, छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?

आरक्षणावरील मुख्यमंत्री शिंदेंचे विधानसभेतील भाषण भाजपा-RSS ने दिलेला ड्राफ्ट, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss