Tuesday, April 23, 2024

Latest Posts

Sambhaji nagar मध्ये बुडालेल्या बँकांमधील ठेवी परत मिळण्यासाठी काढला मोर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली बुडालेल्या बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली बुडालेल्या बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी काढण्यात आलेल्या आंदोलनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. तर या संपूर्ण परिस्थीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा ही चालू आहे.

संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्था , ज्ञानोबा अर्बन सोसायटी , मलकापूर बँक अशा तीन ते चार बँका आणि पतसंस्थामध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले आहे ते पैसे परत मिळावे या मागणीसाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आज शेकडोच्या संख्येने ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. बुडालेल्या बँकांमधील ठेवी परत मिळाव्या यासाठी संभाजीनगरमध्ये ठेवीदार महिलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी ठेवीदार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत होते. कार्यालयांच्या गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन तणाव पूर्ण वातावरण तयार झाले होते. यावेळी इम्तियाज जलील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ठेवीदार आंदोलकांच्या पायावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती आहे. आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली असून आयुक्त कार्यालायाला छावणीचं स्वरूप आलं आहे. अग्निशामक दल आणि दंगल नियंत्रण पथक देखील आंदोलनस्थळी दाखल झालं आहे.

यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला गेटवरण चढून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं या ठेवीदाराचे नेतृत्व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील करत होते. जलील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, गोंधळानंतर आता आणखी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी थांबून आहे. तर, दुसरीकडे जलील लेखी आश्वासनावर ठाम आहेत.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss