Saturday, July 27, 2024

Latest Posts

हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला भारतरत्न मिळायला हवा – Raj Thackeray

भारत सरकारकडून यंदाच्या वर्षी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एम.एस. स्वामीनाथन (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार) यांना यंदाच्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली. नरेंद्र मोदी यांनी एका मागोमाग तीन ट्विट केले. गेल्या आठवड्यामध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न (Bharatratna) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीट करत एक इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे? 

माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.

भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात येतो? 

भारतरत्न (Bharat Ratna) हा पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या आणि एखाद्या क्षेत्रामध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकारकडून भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

हे ही वाचा: 

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता;विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss