Sunday, May 12, 2024

Latest Posts

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध

मुंबईमधील दहिसरमध्ये काल रात्री मुंबई महानगरपालिकेचे ठाकरे गटाचे आमदार अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

मुंबईमधील दहिसरमध्ये काल रात्री मुंबई महानगरपालिकेचे ठाकरे गटाचे आमदार अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकरांना गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वतःला सुद्धा गोळ्या झाडून आत्महत्या केली. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि शिवसेनेच्या नेत्यानी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून मॉरिस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिस याने स्वतःलाच गोळ्या घातल्या.मॉरिसचा मृतदेह दहिसरमधील चर्चमध्ये दफन केला जाणार होता मात्र स्थानिकांनी मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास विरोध केला आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर दहिसरच्या दौलतनगर भागात कडकडीत बंद करण्यात आला आहे. या भागातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबियांना मानणारा मोठा परिवार वर्ग आहे. अभिषेक यांची मॉरिसने हत्या केल्यानंतर अभिषेक घोसाळकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. स्थानिकांनी मॉरिसचे पार्थिव स्थानिक चर्चमध्ये दफन करण्यास विरोध केला आहे. लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चच्या आवारात मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह दफन करण्यात येणार होता. त्यामुळे आता चर्चचे फादर जेरी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. फादर जेरी यांनी जर मॉरिसचा मृतदेह दफन करण्याची परवानगी नाकारली जात त्याचा मृतदेह गोराई येथील सार्वजनिक दफनभूमीत नेला जाईल.

ठाकरे गटाचे माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द करून घोसाळकर कुटुंबाची भेट घेतली. अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्ययात्रेसाठी स्थानिक शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. त्यांच्यावर पुढील काही वेळातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हे ही वाचा: 

महाराष्ट्राचे चरित्र सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामे द्यावे; आमदार यशोमती ठाकूर यांची टीका

राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे…Jitendra Awhad यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss