Saturday, May 18, 2024

Latest Posts

महाराष्ट्र भूषण पुरस्कारांमध्ये मृत पावलेल्या श्री सेवकांच्या या घटनेनंतर, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळा लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने १३ श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक आहे. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही आबासाहेब यांनी केले होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांच्या मृत्यूनंतर एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेलं सारे श्री सदस्य हे माझ्या कुटूंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे.

उभा पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दांमध्ये व्यक्त कारण्यापलीकडेचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

उष्मा घाटाने १३ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दुःखवटा पाळला आहे. पुढील दोन दिवस आप्पासाहेब आपल्या भक्तांना भेटणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानाबरोबर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्त रांगोळी आणि फुलांची सजावट केली होती परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे फुलांची सजावट रांगोळी फुलांची सजावट काढण्यात आली आहे. राज्याचे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जरी केली आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री सेवकांची विचारपूस केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयात जात उपचार घेत असलेल्या श्री सेवकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हे ही वाचा : 

पुण्यामध्ये गारायुक्त पावसाला सुरूवात, पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा

आमच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना लावली आहे, संजय राऊत

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss