Friday, May 17, 2024

Latest Posts

पुण्यामध्ये गारायुक्त पावसाला सुरूवात, पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा

पुणे (Pune) शहरामध्ये दिवसा कडाक्याचे उन जाणवत असताना आज सायंकाळी पुणे शहरामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे (Pune) शहरामध्ये दिवसा कडाक्याचे उन जाणवत असताना आज सायंकाळी पुणे शहरामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. परंतु त्याअगोदरच दुपारी साडे तीनच्या सुमारास गारायुक्त पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्यामध्ये व राज्यामधील तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. त्यांनतर ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

केरळ ते छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सध्या आकाशामध्ये मोठे ढग तयार होण्यास सुरुवात झाली आहे आणि काही मोठे ढग पुणे शहर व जिल्ह्यावर येत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने पुण्यामध्ये व जिल्यात यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यांसह, विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊल कोसळण्याची शक्यता आहे. तसेच शहराच्या आजूबाजूला चारनंतर पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने अंदाज वार्तिविला आहे. नागरिकांच्या ढगांच्या गडगडाटावेळी झाडाखाली आसरा घेऊ नये, पाऊस पडल्याने रस्ते निसरडे होतात आणि वाहने घसरतात. त्यामुळे वाहने हळू चालवावीत. विजांच्या कडकडाट असताना मोबाईलचा वापर करून नये, जेव्हा जोरदार वर वारा असेल तर दारे आणि खिडक्या बंद कराव्यात. अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

अवकाळी पावसामुळं राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुण्यात देखील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. खडकी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, धनकवडी परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळं ट्रॅफिक जाम झालं असून सेनापती रोड, बापट रोड, लॉ कॉलेज रोड परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. घोरपडी, औंधसह कात्रजमध्ये जोरदार गारांचा पाऊस सुरू झाला आहे.

हे ही वाचा : 

सहा वर्षात उत्तर प्रदेशमध्ये झालेत १०,७१५ एन्काऊंटर, योगींच्या कार्यशैलीने उत्तर प्रदेश ठरतोय उत्तम प्रदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयकडून चौकशी

अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss