Saturday, July 27, 2024

Latest Posts

केंद्र सरकारकडून कांदा निर्यतींवर बंदी, कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता केंद्र सरकारने कांदा लिलावावर बंदी आणल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्राने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. हे परिपत्रक केंद्राने ८ डिसेंबर रोजी काढले आहे. याआधी कांद्यावरील निर्यात दर मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा केंद्राने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाची बातमी मिळाल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. तसेच ठिकठिकाणी लिलाव बंद पडले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर ५०० ते १००० रुपयांनी घसरण्याची झाली आहे.

नाशिक मधील शेतकऱ्यांनी उमराने येथे शुक्रवारी मुंबई आग्रा महामार्ग काही वेळ रोखून धरला. कांदा निर्यातीच्या बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुंगसे, उमराने, चांदवड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. त्यानंतर व्यापारी समित्या आणि बाजार समितीमध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. लासलगाव, पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आक्रमक झाले आहेत. चांदवड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडला. पिंपळगाव, लासलगाव, उमराना, मुंगसरा येथे ७५ टक्के बाजार बंद ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने लाला कांद्याची वाट न बघता कांद्यावर निर्यात बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. गुजरात, राजस्थान, आंध्रमध्ये कांद्याची मोठी आवक होत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम या सर्व राज्यांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कांद्यावर ८०० डॉलर मूल्य लावले आहे. केंद्र सरकारच्या वतीने नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून २ लाख टन कांदा २५ रुपये किलोने विकला.

हे ही वाचा:

‘अस्मिता’ फेम अभिनेत्री मयुरी वाघने खरेदी केलं नवं घर

बॉम्बे हायकोर्ट’ चे नाव ‘मुंबई हायकोर्ट’ होणार, संसदेमध्ये मंत्र्यांनी उत्तर दिले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss