Friday, May 17, 2024

Latest Posts

भारत जोडो न्याय यात्रा धुळे मालेगावात दाखल, १७ मार्चला शिवाजी पार्कवर समारोप

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रामध्ये (Maharashtra ) दाखल झाली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रामध्ये (Maharashtra ) दाखल झाली आहे. त्यांचा आज महाराष्ट्रामधील दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रामधील नंदुरबारमधून यात्रेला सुरुवात झाली आहे. तर आज भारत जोडो न्याय यात्रा (Dhule News) आणि मालेगावचा (Malegaon) टप्पा करणार आहे. आज दुपारी ३ वाजता मालेगावमध्ये राहुल गांधी यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर राहुल गांधी मुंबईच्या दिशेने येणार आहेत. १७ मार्चला राहुल गांधी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी चौकात सभा घेणार आहेत.

१४ मार्चला राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांना शरद पवार भेटणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याने अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या सभेला उपस्थिती लावणार आहेत. या यात्रेचा समारोप मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा १७ मार्चला मुंबईमध्ये आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारआणि इतर नेते सभेला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत.भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपा वेळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. या सभेसाठी काँग्रेस नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांना देखील या सभेसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

हे ही वाचा:

सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात ; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Thane लोकसभेमुळे CM शिंदेंचं संपणार होतं Career, पुन्हा एकदा शिंदेंची Accid Test

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss