Monday, May 20, 2024

Latest Posts

छत्रपती संभाजीनगर मध्ये भावांनी केली बहिणीची कुऱ्हाडीने हत्या

मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. खून, मारामारी हे आपण फक्त चित्रपटामध्ये पाहिलं असेल पण असाच एक प्रकार संभाजी नगरमध्ये घडला आहे. प्रेमसंबंधावरून दोन भावांनी मिळून बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ४ जणांवर फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय ३५ वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणात महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध होते.त्याचा संशय आई वडील आणि भावांना आला होता. शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय ३० वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी चंद्रकला बावसकर या धावत आल्या. त्या तेव्हा खूप घाबल्या होत्या. ‘माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी शमीम यांच्याकडे विनवणी केली.त्यामुळे शमीम यांनी तिला बकरीच्या शेडमध्ये लपण्यासाठी सांगितले. त्यानंतर चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर हे दोघे तिथे धावत आले आणि त्यांच्या हातात कुह्राड होता. त्यानंतर त्यांनी त्या शेडची पहाणी करून चंद्रकला याना शोधून काढले. तसेच हातात असलेला कुह्राड तिच्या डोक्यात घातला. त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने तिकडे चंद्रकला यांचे आईवडील आले. त्यानंतर त्यांनी शमीम याना मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही हत्या प्रेमसंबंधावरून केली असल्याचे समोर आले आहे.

शमीम यांनी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस लगेच फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेला सर्व प्रकार पहिला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. तर, सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Latest Posts

Don't Miss