मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ! कांदा निर्यातबंदी हटवण्याचा घेतला मोठा निर्णय

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ! कांदा निर्यातबंदी हटवण्याचा घेतला मोठा निर्णय

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती, त्यामुळे, विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार, संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष केले होते. त्यावरून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद रंगला होता. आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली असून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने ९९ हजार १५० टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन चांगला दर मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, २७ एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. केंद्र सरकारने बांग्लादेश, युएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशामध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आखाती देश व काही युरोपियन देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला होता. त्यामुळे, अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. हि बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. मात्र ३१ मार्च नंतरही कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली नव्हती. आता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

“शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही”;SANJAY RAUT यांचा PM NARENDRA MODI यांच्यावर निशाणा

PM NARENDRA MODI यांची आज कोल्हापूरात तोफ धडकणार;उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version