Thursday, May 9, 2024

Latest Posts

PM NARENDRA MODI यांची आज कोल्हापूरात तोफ धडकणार;उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा 

संजय मंडलिक आणि हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मोदी मैदानात

Loksabha Election च्या मतदानाचा दुसरा टप्पा काल पार पडला.तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वपक्षीयांची जय्यत तयारी सुरु आहे.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगत असताना उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांंनी चांगलीच कंबर कसली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi  खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरात येणार आहेत.

कोल्हापुरातील शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik ) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairshil Mane)यांच्या प्रचारार्थ मोदी मैदानात उतरले आहेत. कोल्हापुरातील ताराराणी चौकापासून तपोवन मैदानापर्यंत मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तपोवन मैदानावर सभास्थळाची पाहणी केली.

महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्याने महायुतीकडून आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.त्यामुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदीं कोल्हापूरात जोरदार प्रचार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असून पक्षातील नेते देखील उपस्थित राहणार. वडिलांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजी महाराज प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.त्यामुळे “मोदी”विरुद्ध “गादी” असे समीकरण दिसून येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा प्रभाव हा मतांवर पडेल अशी आशा महायुतीला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ३ दिवसात महाराष्ट्रात ७ सभा आहेत तर सोलापूर, कराड, पुणे, लातूर, धाराशिव, कोल्हापूर असा दौरा असणार आहे. २९ एप्रिल ला महायुतीच्या पुणे आणि बारामतीच्या उमेदवारांसाठी पुण्यात मोदींची सभा आणि रोड शो होणार आहे.

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss