Tuesday, May 21, 2024

Latest Posts

देशात PM MODI यांचीच गॅरेंटी चालते- CM EKNATH SHINDE

रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज पारशिवनी आणि रामटेक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष मेळावे पार पडले. यावेळी मतदारांशी संवाद साधून राजू पारवे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रामटेक मतदारसंघ हा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे आपण सर्वजण या मतदारसंघातून प्रभू श्रीरामांना मंदिरात नेऊन विराजमान करणारा उमेदवार विजयी कराल, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

देशाचे भवितव्य भक्कम हातात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. देशात गेल्या १० वर्षात मोदी यांनी अनेक विकासकामे केली असून देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे, त्यामुळेच या देशात मोदी यांचीच गॅरेंटी चालत असून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवून त्यांची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी राजू पारवे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य सरकारच्या माध्यमातून या भागात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यात प्रामुख्याने रस्ते, कालवे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणे, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, रासप आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

SHIVSENA कोण वाचवते हे येणारा काळ ठरवेल -VIJAY WADETTIWAR

अखेर MAHAVIKAS AGHADI चा प्रश्न मार्गी लागणार, कधी मिळणार उत्तर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss