मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा सगळीकडे चर्चेत आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शिंदे समतीकडून (Shinde Committee) राज्यभरात मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत. असेच असताना काही प्रमाणात मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठा समाजाच्या सापडलेल्या कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका अशा सूचना न्या. शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे समोर आले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तत्काळ थांबवण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यातच अचानक एवढ्या प्रमाणात कुणबी नोंदी कश्या सापडत आहेत असा प्रश्न ओबीसी नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आपापल्या विभागात, जिल्ह्यांत सापडलेल्या कुणबी नोंदी, दिलेली प्रमाणपत्रे याची आकडेवारी जाहीर करू नका,’ अशा सूचना न्या. शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे समोर आले आहे. मराठा कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पुणे येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जात नोंदीच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे विभागीय आयुक्त, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. न्या. संदीप शिंदे समितीकडून मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. मात्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कुणबी नोंदी सापडत नसल्याने शिंदे समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला आहे. मनोज जरांगे हे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे.शिंदे समितीकडून स्थापन करण्यात आलेली समिती कुणबी नोंदी शोधण्याचे काम करत आहे. आतापर्यंत कोट्यवधी कागदपत्रे तपासण्यात आले असून, लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पण शिंदे समितीच रद्द करा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
हे ही वाचा:
ठाण्यातील कासारवडवली आनंदनगरमध्ये तरुणाची तलवारीने वार करून हत्या
POLITICS: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका- CHHAGAN BHUJBAL