Monday, May 20, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे आणि ड्रग्स माफिया ललित पाटील यांचे फोटो व्हायरल

या प्रकरणाबाबत शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी ललित पाटीलसोबतच्या फोटोंची चौकशी करा अशी मागणी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हायरल झालेला फोटो २०१८ मधील आहे. त्यावेळी ललित पाटील शिवसेनेत दाखल झाला होता आणि २०१९ च्या प्रचार रॅलीमध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता. त्याचबरोबर काही फोटोंमध्ये उद्धव ठाकरे, दादा भुसे आहेत आणि काही फोटोत खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार बबनराव घोलप आहेत.

ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या आरोपीचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. म्हणूनच, शिंदे गटाकडून त्या फोटोंची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याचसोबत, ठाकरे गटाकडून असा आरोप केला जात आहे की, दादा भुसे हेच ललित पाटीलला मातोश्रीवर घेऊन आले होते.

पुण्याच्या ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाला. त्यावरून तो कोणाच्या मदतीने फरार झाला याबद्दल राजकीय चर्चा आणि आरोप झाले. ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्यावर आरोप केला जात आहे. तसेच, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात दादा भुसे यांनी आधी पुरावे सिद्ध करा, मगच आरोप करा. पुरावे सिद्ध झाले नाहीत, तर मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

या प्रकरणाबाबत शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी ललित पाटीलसोबतच्या फोटोंची चौकशी करा अशी मागणी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हायरल झालेला फोटो २०१८ मधील आहे. त्यावेळी ललित पाटील शिवसेनेत दाखल झाला होता आणि २०१९ च्या प्रचार रॅलीमध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता. त्याचबरोबर काही फोटोंमध्ये उद्धव ठाकरे, दादा भुसे आहेत आणि काही फोटोत खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार बबनराव घोलप आहेत.

हे ही वाचा: 

सुषमा अंधारे यांचं पुन्हा दादा भुसेंना आव्हान ; पुरावे लवकरच समोर आणणार

सुप्रीम कोर्ट करणार नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss