Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Exclusive: शिवसेनेचे इस्लामीकरण? कार्यकर्त्यांशी जवळीक, काय म्हणाले Arvind Sawant?

नुकतेच टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी शिवसेनेचे नेते आणि २ वेळा खासदार राहीलेले प्रतिनिधी अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेचे इस्लामीकरण होत चालले आहे. सध्या शिवसेनेमध्ये बरेच मुस्लिम मतदार देखील आहेत. तसेच सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे अश्या टीका चहूबाजूंनी लोक करत आहेत.

टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी शिवसेनेचे नेते आणि २ वेळा खासदार राहीलेले अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेचे इस्लामीकरण होत चालले आहे. सध्या शिवसेनेमध्ये बरेच मुस्लिम मतदार देखील आहेत याबाबतचा प्रश्न विचारला असता, सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे अशा टीका चहूबाजूंनी नागरिक  करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर हिंदुत्व सोडले आहे अशी टीका केली असल्याचे मत अरविंद सावंत यांनी टाईम महाराष्ट्र या वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. या मुस्लिम मतदारांना तुम्ही कुठे पाहता असा प्रश्न केल्यानंतर अरविंद सावंत म्हणाले, ‘इस्लामीकरण केलंय किंवा हिंदुत्व सोडलंय म्हणजे नेमकं काय केलंय? काँग्रेसबरोबर जाणे किंवा मुस्लिम आमच्यासोबत आले म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलंय असं होतं का? तुम्ही देखील मुस्लिमांना शोधून मंत्री करून त्यांना पुन्हा घरी पाठवलंय. आम्ही तस कधीही केलेलं नाही. आम्ही हिंदुत्व सोडलं नाहीये आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आम्ही तर धर्मपालन केलंय’.

आतापर्यंत भाजपचे २ विद्यमान खासदार भाजपने घरी पाठवले आहेत. यावर जेव्हा गल्लीतील राजकारण दिल्लीत जाऊन पोहोचतं तेव्हा नाराजी व्यक्त केली जाते. असा प्रश्न करताच अरविंद सावंत म्हणाले, ‘एखादा खासदार मतदारसंघासाठी काय करतो हे नाही तर तो देशामध्ये काय आवाज उठ्वतोय हे विचारायला हवं. साधी साधी कामं  करण्याची जबाबदारी ही नगरसेवक किंवा इतर लोकांवर असते खासदारांवर नसते. लोकसभा आणि राज्यसभा मधील फरक कळायला हवा. प्रत्येकाला सीमा असते. देशाचे प्रश्न वेगळे असतात राज्याचे प्रश्न वेगळे असतात. देशासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. मुंबईमध्ये उद्योग आणणं गरजेचं आहे. आपल्याकडील उद्योग हुकूमशाहीवर घेऊन जात आहेत. गुजरातचा देखील विकास झाला पाहिजे. परंतु, आमच्याकडे जे आहे ते नेण्याची काय गरज? नको तिथे सक्ती करण्याची गरज काय? महाराष्ट्राचं हित पाहायला हवं. मुंबई महानगरपालिका आणि राज्य पातळीवरच्या PWD च्या कान्ट्रेक्टर मध्ये त्यांना फारसा रस नसल्याचे सांगत सर्व जण ज्याचे त्याचे काम पाहत असल्याचे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

आचारसंहितेचे पालन करत असताना, कधीही साधी कामं जसे की कुठल्या पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी होणे किंवा पालखीमध्ये सहभागी होणे हे न करूनही खालचा कार्यकर्ता जो असतो तो तुमच्याशी कसा कनेक्ट राहतो असा प्रश्न केल्यानंतर अरविंद सावंत म्हणाले, ‘काही कार्यक्रमात मी सहभागी होत असतो, मी शक्य असेल तितकी मदत करतो पण त्याचा गाजावाजा मात्र करत नाही. मी जमेल त्या कार्यक्रमात जातो पण लोकांची कामे करून, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्याशी कनेक्ट राहता येते’, असे उत्तर अरविंद सावंत यांनी दिले.

हे ही वाचा:

सत्ता जाण्याच्या भीतीने विरोधक घाबरले आहेत, Rahul Gandhi यांचा PM Modi, BJP वर हल्लाबोल Exclusive Arvind Sawant: Uddhav Thackeray यांचं मला कौतुक वाटतं, कारण… Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss