Monday, April 22, 2024

Latest Posts

सांगली बाजारपेठेत मुहूर्ताच्या हळदीला मोठी मागणी, हळदीच्या दरात वाढ

महाराष्ट्र्रामध्ये हळदीच्या(Turmeric) पिकाला विशेष मागणी आहे.

महाराष्ट्र्रामध्ये हळदीच्या(Turmeric) पिकाला विशेष मागणी आहे. जेवण्याच्या पदार्थांपासून ते लग्नाच्या मुहूतापर्यंत सगळीकडे हळद वापरली जाते. हळदीची लागवड देशभरात सगळीकडे केली जाते. प्रत्येक घरामध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून हळदीचा वापर केला जातो. हळदीला औषधी पदार्थ म्हणून देखील वापरले जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये हळदीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे बाजारात हळदीला चांगला भाव मिळत आहे. हळदीचा वापर अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही(Beauty products) केला जातो.

हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हळदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीला चांगला भाव मिळाला आहे. या लिलावामध्ये राजापुरी हळदीला ३१००० इतका वाढीव भाव मिळाला आहे. नवीन हळदीचा लिलाव शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील आणि बाजार समितीचे सभापती सुजय (नाना) अशोकराव शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला आहे. मुहूर्ताच्या नवीन हळदीच्या लिलावाची सुरुवात शुभारंभ श्री गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी येथून झाली. नवीन आणलेल्या हळदीच्या पोत्याची पूजा केली जाते. त्यानंतर लिलाव केला जातो. राजेंद्र आनंदराव पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला ३१००० रुपये दर मिळाला आहे.त्यानंतर दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने या हळदीची खरेदी केली आहे.

जगभरात सगळीकडे हळदीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. ८० टक्के हळदीचे उत्पादन एकटा भारत देश घेतो. तसेच शेतकरी हळदीची लागवड करून चांगला नफा मिळवतात. भारतातील प्रत्येक राज्यात हळदीच पिकं घेतलं जात. बाजारात हळदीला मोठी मागणी आहे. ब्युटी प्रोडक्ट्समध्ये हळदीचा वापर केला जातो.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाट्न

राजकारण करू पाहणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? – Aaditya Thackeray

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss