मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे उदघाटन १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उदघाटन केले जाणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण १९ फेब्रुवारीला केले जाणार आहे. यासोबतच, १५ मे पर्यंत दोन्ही फेज सुरु करण्यात येतील, अशी माहिती बृहन्मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. त्यानंतर आता युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या कोस्टल रोडबाबत ‘एक्स’ या हॅन्डलवर एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये त्यांनी काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल, असे म्हटले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मुंबई कोस्टल रोड…
कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै २०१३ मध्ये मांडला, त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. २०१७-१८ मध्ये कामाला सुरुवात झाली. २०२२ मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत ६५% काम पूर्ण झाले होते. आम्ही दर आठवड्याला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो. भारतातल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीनचे येथे काही फोटो देत आहे: मावळा!
कोविडच्या काळात हे मशीन आले, तेव्हा BMC अधिकाऱ्यांनी विचारले, ह्याला काय म्हणायचे? त्यावेळी मी “मावळा” नाव सुचवले… TBM चे काम पाहिल्यावर लक्षात येते, मुंबईतला मलबार हिल फोडून समुद्राखालचा तो पहिला बोगदा बनवला गेला. TBM च्या ह्या कामाला साजेसं एकमेव नाव… मावळा!
अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली. कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करुन निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
हे ही वाचा:
आगामी लोकसभा निवडणुकीत कळसाला भगवा फडकवायचा आहे – उद्धव ठाकरे
आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल