Friday, May 17, 2024

Latest Posts

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खरपूस टीका केली. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) महायुतीवर (Mahayuti) संविधान बदलण्यासंबंधी आरोप करण्यात येत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, “विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाही, आणि निवडणुका आल्या की त्यांच्याकडून खोटे आरोप करण्यात येतात.” धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी गिरीश महाजन बोलत होते.

आज धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला यापूर्वी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यानंतर धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल जवळ एका कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेमध्ये सिंदखेडराजाचे आमदार जयकुमार रावल, मंत्री दादा भुसे तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सभेला संबोधित केले.

यावेळी, गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाही, आणि खोटे आरोप निवडणुका आल्या की त्यांच्याकडून करण्यात येतात. मुंबईला तोडायचा आहे, संविधान बदलायच आहे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या त्यांच्यातर्फे पसरवल्या जात आहेत, त्यांच स्वतःचा कर्तुत्व काहीच नाही त्याचबरोबर साठ वर्ष पवार साहेबांनी देखील काहीही केलं नाही, आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर देखील पडले नाहीत. मंत्रालयाची पायरी देखील उद्धव ठाकरे यांनी चढली नाही आणि आता खोट्या बातम्या त्यांच्यातर्फे पसरवल्या जात आहेत,” अशी भावना व्यक्त करत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. .

नाशिकच्या जागेसंदर्भात अद्यापही महायुतीचा निर्णय होत नसून, महायुतीचा नाशिक येथील लोकसभा निवडणुकीच्या जागे संदर्भातील तिढा अद्यापही कायम आहे. याबाबत प्रश्न विचारला असता गिरीश महाजन यांनी ‘येत्या दोन दिवसात नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल, आणि लवकरच तेथील उमेदवारी जाहीर होईल,’ असे म्हंटले. “पक्षश्रेष्ठींतर्फे यासंदर्भात बोलणं सुरू असून जो पण निर्णय होईल ती जागा महायुतीची निवडून येईल,” असा विश्वास देखील मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या जागेसंदर्भात बोलताना व्यक्त केला आहे.

भाजपविरोधी लाट असल्याच्या विरोधकांच्या टिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की, “४ जूनला निकाल लागल्यानंतर विरोधकांना समजेल की आपण किती खोट्या विश्वात वावरत होतो,” असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी ‘पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना जनता पंतप्रधान म्हणून निवडून देतील, आणि भाजप ४०० पार निवडून येईल’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातुन गुजरातला उद्योगधंदे पळवलात आता निवडणूकीत महाराष्ट्र आठवला का? Nana Patole यांचा PM Modi यांना सवाल

जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, PM Narendra Modi यांचे साताऱ्यातून विरोधकांवर टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss