मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी आंतरवली सराटी मध्ये बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावायचं असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. मी मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
जालन्यातील आंतरवली सराटी मध्ये उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांनी १० फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी अन्न आणि पाणीही घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच ते कोणतीही वैद्यकीय उपचार घेणार नाहीत असे देखील बोलले होते. त्यामुळे आज सकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्त येत होते. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चकडून मोठा पाठिंबा दिला जात आहे. आळंदी, पुरंदर, बारामती, सोलापूर, मनमाड ही ठिकाण बंद ठेवण्यात आली आहे. शहरी भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
मनोज जरांगे १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सकाळपासून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या निवासस्थानासमोर मराठा आंदोलक उपोषण करत आहेत.
हे ही वाचा:
‘सिंगम ३’ मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायकाची भूमिका, व्हिलन लूक झाला आउट
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले विविध महत्त्वाचे निर्णय, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ