Tuesday, April 16, 2024

Latest Posts

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या सविस्तर…

सध्या राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालाबाबत चर्चा ही सुरु आहे. फेब्रुवारी महिना हा अवघ्या काही तासात सुरु होईल त्यामुळे मुलांची चिंता त्याच बरोबर त्यांच्या पालकांची चिंता ही वाढू लागली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालाबाबत चर्चा ही सुरु आहे. फेब्रुवारी महिना हा अवघ्या काही तासात सुरु होईल त्यामुळे मुलांची चिंता त्याच बरोबर त्यांच्या पालकांची चिंता ही वाढू लागली आहे. फेब्रुवारी अंडी मार्च महिना हा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा महिना आहे. अश्याच विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

यावर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाने काही महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. आता बोर्डाने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले आहे. दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून (३१ जानेवारी) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाचा बदल केला आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून झालेल्या मागणीनुसार परीक्षाचा वेळ १० मिनिटांनी वाढवून दिला आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. म्हणजे सकाळी ११ वाजता परीक्षा सुरु होणार असेल तर विद्यार्थ्यांना १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता परीक्षा असेल तर विद्यार्थ्यांना २.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे, असे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारपासून दहावीचे हॉल तिकीट जारी करणार आहे. आता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच लेखी परीक्षेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट देण्यात येणार आहे. या हॉल तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे आदेश बोर्डाने विद्यालयांना दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss