इंडिगोने दिली नाशिककरांना मोठी भेट, तब्बल ३२ शहरांसोबत होणार सुपरफास्ट कनेक्टिविटी…

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून अखेर नाशिक शहराची विमानसेवा ही इत्तर शहरांना जोडणार आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकच्या प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडिगोने दिली नाशिककरांना मोठी भेट, तब्बल ३२ शहरांसोबत होणार सुपरफास्ट कनेक्टिविटी…

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून अखेर नाशिक शहराची विमानसेवा ही इत्तर शहरांना जोडणार आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकच्या प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जूनपाससून नवीन वेळापत्रकानुसार नाशिकरांना विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार नाशिकमधून तब्बल ३२ शहरांना जोडले जाणार आहे.

नाशिक शहराच्या विमानसेवेला गेले काही वर्ष बराच तोटा झाला असून,अनेक सेवा बंद पडत असल्याने, अनेक प्रसिद्ध एअरव्हेज कंपन्या नाशिकमधून काढता पाय घेत असल्याने प्रवाशी संख्येत मोठ्या प्रमाणात देखील घट झाली आहे.परंतु आता पुन्हा एकदा इंडिगोने (Indigo) जूनपासूनचे वेळापत्रक जाहीर केल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. इंडिगोने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकात देशभरातील महत्त्वाच्या शहरांना समाविष्ट केले आहे. ३२ शहरांपैकी ६ धार्मिक शहरं पुढील प्रमाणे आहेत. कोलकाता, तिरुअनंतपुरम, वाराणसी, तिरुपती, बेंगलुरु,अमृतसर.नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला यानिमित्ताने चालना मिळून विकासाची गती वाढणार आहे.

सध्या नाशिक विमानतळावरून स्पाईसजेट कंपनीची नाशिक-नवी दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरू आहे. तर, १५ मार्चपासून इंडिगो कंपनीची सेवा सुरू झाली आहे. इंडिगोच्यावतीने गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जात आहे. येत्या १ जूनपासून इंडिगोने विमानसेवेचा विस्तार केला असून नव्याने जाहीर केलेल्या शेड्यूलमध्ये अहमदाबाद, नॉर्थ गोवा, इंदूर, हैदराबाद, नागपूर, अमृतसर, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकता, कोझिकोड, लखनौ, मेंगलुरु, रायपूर, राजमुंद्री, रांची, तिरुअनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, विजयवाडा या शहरांचा समावेश केला आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version