Saturday, May 18, 2024

Latest Posts

शिंदेंच्या शिवसेनेत गुंडांचा सहभाग, CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांच्यावर Sanjay Raut यांचे गंभीर आरोप

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शनिवार, ४ मे) माध्यमांशी संवाद साधत शिवसेना शिंदे गटावर (Shivsena) जोरदार टीका केली. ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या निवडणूक अर्ज दाखल करतेवेळी झालेल्या गदारोळावरून संजय राऊत यांनी शिंदे गटावर ताशेरे ओढले आहेत.

संजय राऊत म्हणाले, “दोन महिन्यापूर्वी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री गुंडा टोळी आणि त्यांचे मोरके यांचे कसे घनिष्ठ संबंध वाढत चालले आहेत याचे मी किमान दहा ते बारा फोटो गुंड टोळ्यांच्या मोरक्यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर मी प्रसिद्ध केले. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री यांचे पुत्र कल्याण डोंबिवली भागामध्ये आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक गंभीर गुन्ह्यातील गुंड आपल्या पक्षात घेऊन कसा दहशतवाद निर्माण करत आहेत हे मी समोर आणलं होतं. त्याच्यामुळे निवडणूक उमेदवारी भरण्याचा त्यांच्या रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्या गुंड टोळ्यांचा आपापसात गॅंगवॉर झाला. ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ठाणे आणि डोंबिवली परिसरामध्ये अनेक गुंड टोळ्या मिळून त्यांचा पक्ष निर्माण झाला आहे. शिवसैनिकांचा तो पक्ष नाही. तुरुंगातून गुंडांना सोडायचं, गुन्हेगारी आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायचा ही सध्या राज्यातली स्थिती आहे.”

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला पट्टी लावून बसले आहेत. ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत ते तुरुंगात जायला पाहिजे अशी फडणवीस यांची भूमिका होती, पक्षाची भूमिका होती. त्यांना शिवसेना फडणवीस गटाने उमेदवारी दिली आणि त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहेत. हा त्यांच्यावर घेतलेला काळाचा सूड आहे. यामिनी जाधव यांचा अर्ज भरायला ते जाण्याआधी फडणवीस यांनी जाधव दाम्पत्यावर विधानसभेत भाषण केलं होतं. ते एकदा ऐकावं आणि मग स्वतःला आरशात पहावं. महाराष्ट्र हा सध्या गुंडांच्या ताब्यात आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. पोलीस खाक्या दाखवणार नाही, पोलिसांना गुंडा टोळ्यांमध्ये सामील करून पोलीस माफिया हा नवीन प्रकार निर्माण करून त्यांना विरोधकांवर हल्ले करण्यासाठी ठेवलं आहे. सध्या पोलीस हतबल आहेत. त्यांना आमची किती भीती वाटते? हे तुम्ही समजून घ्या. त्यांना संजय राऊत आणि शिवसेनेची किती भीती वाटते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss